सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स

सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
Saint Vincent and the Grenadines
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्सचा ध्वजसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्सचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: "Pax et Justitia" (लॅटिन)
शांतता व न्याय
राष्ट्रगीत: "Saint Vincent, Land so beautiful"
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्सचे स्थान
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्सचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
किंग्सटाउन
अधिकृत भाषाइंग्लिश
सरकारसंविधानिक एकाधिकारशाही
 - राष्ट्रप्रमुखएलिझाबेथ दुसरी
 - पंतप्रधानराल्फ गोन्साल्वेस
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस२७ ऑक्टोबर १९७९ युनायटेड किंग्डमपासून
क्षेत्रफळ
 - एकूण३८९ किमी (१९८वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण१,०३,००० (१९६वा क्रमांक)
 - घनता३०७/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण१.२५९ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न११,७०० अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२००७) ०.७७२ (उच्च) (९१ वा)
राष्ट्रीय चलनपूर्व कॅरिबियन डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी−०४:००
आय.एस.ओ. ३१६६-१VC
आंतरजाल प्रत्यय.vc
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक७८४
राष्ट्र_नकाशा


सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स (Saint Vincent and the Grenadines) हा कॅरिबियनमधील एक छोटा द्वीप-देश आहे. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स कॅरिबियन समुद्रातील अँटिल्स द्वीपसमूहाचा भाग असून त्याच्या उत्तरेला सेंट लुसिया, पूर्वेला बार्बाडोस तर दक्षिणेला ग्रेनेडा हे देश आहेत. ह्या देशाच्या अखत्यारीमध्ये सेंट व्हिन्सेंट हे मध्यम आकाराचे बेटग्रेनेडीन्स ह्या द्वीपसमूहामधील अनेक लहान बेटे आहेत.

इ.स. १७१९ मध्ये हा प्रदेश फ्रेंच वसाहती साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. इ.स. १७६३ साली फ्रेंचांनी सेंट व्हिन्सेंटचा ताबा ब्रिटिशांकडे दिला. त्यापुढील २०० वर्षे ब्रिटिश साम्रज्याचा भाग राहिल्यानंतर १९७९ साली सेंट व्हिन्सेंटला स्वातंत्र्य मिळाले. सध्या राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असणाऱ्या सेंट व्हिन्सेंटमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही प्रकारचे सरकार आहे. युनायटेड किंग्डमची राणी एलिझाबेथ दुसरी ही सेंट व्हिन्सेंटची राष्ट्रप्रमुख असून राल्फ गोन्साल्वेस हा विद्यमान पंतप्रधान आहे.

केळ्याची लागवड व पर्यटन हे प्रमुख उद्योग असणाऱ्या सेंट व्हिन्सेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. सतत येणाऱ्या वादळांमुळे येथील अर्थव्यवस्थेला सर्रास धक्का बसतो.

Other Languages
беларуская (тарашкевіца)‎: Сьвяты Вінцэнт і Грэнадзіны
বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী: সেন্ট ভিনসেন্ট বারো গ্রেনাডাইন
Chavacano de Zamboanga: San Vicente y las Granadinas
Mìng-dĕ̤ng-ngṳ̄: Saint Vincent gâe̤ng Grenadines
客家語/Hak-kâ-ngî: Saint Vincent lâu Grenadines
Kreyòl ayisyen: Sen Vensan ak Grenadin
Bahasa Indonesia: Saint Vincent dan Grenadine
Lingua Franca Nova: San Vinsent e la Grenadines
srpskohrvatski / српскохрватски: Sveti Vincent i Grenadini
oʻzbekcha/ўзбекча: Sent Vinsent va Grenadinlar