युनिकोड

युनिकोड (रोमन लिपी: Unicode ;) हा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमाणभूत होत असलेला असा एक कॅरॅक्टर सेट (कॅरॅक्टर एनकोडिंग) आहे.

कॅरॅक्टर एनकोडिंग

'कॅरॅक्टर एनकोडिंग' ह्या संज्ञेची अगदी सोपी व्याख्या म्हणजे कोठल्याही 'कोणत्याही एका मानवी भाषेतील सर्व अक्षरे, चिन्हे यांना काही विशिष्ट क्रमाने ठरवून दिलेले गणितीय आकडे'.

उदाहरणार्थ, कल्पना करा, की एका भाषेत ('क', 'ख, 'ग', 'घ, 'ञ') ही फक्त पाच अक्षरे आहेत. समजा आपण ठरवले की ही पाच अक्षरे (२१,२२,२३,२४,२५) ह्या पाच आकड्यांनी ओळखायची. असे केल्यास ह्या काल्पनिक भाषेतील कोणताही शब्द किंवा वाक्य आपल्याला हे पाच आकडे वापरून लिहिता येईल. उदा. 'कखग' हा शब्द '२१२२२३' असा लिहिता येईल व 'खघकञ' हा शब्द '२२२४२१२५' असा लिहिता येईल.

येथे (२१,२२,२३,२४,२५) ह्या आकड्यांच्या समूहाचे ('क', 'ख, 'ग', 'घ, 'ञ') ह्या पाच अक्षरांच्या समूहाशी आपण जे नाते ठरवले त्यास एक कॅरॅक्टर संच म्हटले जाते.

हेच उदाहरण पुढे वाढवल्यास मराठीतील १२ स्वर आणि ३६ व्यंजन अक्षरे ही एकूण ४८ आकड्यांनी ओळखता येतील. असे केल्यास हा नवीन कॅरॅक्टर संच एकूण ४८ अक्षरांना आकड्यांचे स्वरूप देईल.

पण असे आकडे ठरवण्याची गरज काय ?

असे करण्याचे एकच कारण आहे व ते म्हणजे संगणकास कोणत्याही भाषेचे ज्ञान नसते. संगणकावर साठवलेली सर्व माहिती ही केवळ आकड्यांच्या स्वरूपात साठवलेली असते. त्याचप्रमाणे संगणकास समजणारी सर्व आज्ञावली हीदेखील आकड्यांच्याच स्वरूपात साठवली जाते.

संगणकाची ही रचना लक्षात घेतली की कॅरॅक्टर संचाचे महत्त्व लक्षात येईल. संगणकास भाषा वा अक्षरे समजत नसल्यामुळे, सर्व अक्षरे, चिन्हे (उदा प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम इत्यादी) हीदेखील केवळ आकड्यांच्याच स्वरूपात साठवावी लागतात. त्यामुळे कोणताही मजकूर साठवताना कोणत्यातरी एका कॅरॅक्टर एनकोडिंगच्या साहाय्याने तो आकड्यांच्या स्वरूपात साठवला जातो. तो मजकूर पुन्हा दाखवताना (उदा. काँप्युटर मॉनिटरवर दाखविताना ), त्याच आकड्यांवरून अक्षरे ठरवून दाखवली जातात. अशा प्रकारचा एक कॅरॅक्टर संच आहे, जो जगातल्या सध्याच्या बहुतांश संगणकांतील बहुतेक सर्व सॉफ्टवेअर्समध्ये वापरला जातो - तो म्हणजे आस्की (इंग्लिश: ASCII - American Standard Code for Information Interchange. आस्की ह्या सेटमध्ये रोमन लिपीतील सर्व अक्षरे, अंक, विरामचिन्हे (पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह इत्यादी) , तसेच इतर काही चिन्हे ह्यांच्यासाठी एकूण १२८ आकड्यांचा क्रम ठरवला गेला आहे. A ते Z ही अक्षरे ६५ ते ९० ह्या आकड्यांनी तर a ते z ही अक्षरे ९७ ते १२२ ह्या आकड्यांनी ओळखली जातात. अक्षरेच नव्हे तर अंकदेखील काही विशिष्ट आकड्यांनी दर्शविले जातात. 0 ते 9 हे अंक आस्की मध्ये ४८ ते ५७ असे साठवले जातात. दोन शब्दांमधली रिकामी जागा दर्शविण्यासाठी ३२ हा आकडा आहे.


उदा. cat हा शब्द आस्कीमध्ये ९९ ९७ ११६ ह्या तीन आकड्यांत साठवला जातो; तर Cat हा शब्द ६७ ९७ ११६ असा साठवला जातो. 'Windows 95' हा मजकूर '८७ १०५ ११० १०० १११ ११९ ११५ ३२ ५७ ५३' असा होईल व संगणकात साठवला जाईल. आस्कीप्रमाणे इतर अनेक कॅरॅक्टर सेट्‌स प्रचलित असून बहुतांश देशांमध्ये त्या देशाच्या भाषेप्रमाणे कोणतातरी एक कॅरॅक्टर संच प्रमाण मानला जातो. भारतीय भाषांकरिता प्रमाण कॅरॅक्टर सेट इस्की (इस्की) हा आहे. (हा भारतीय सरकारद्वारे साधारणतः १९८० च्या दशकात विकसित करण्यात आला)

असाच एक कॅरॅक्टर सेट म्हणजे युनिकोड.

युनिकोड नावाचा नवीन कॅरॅक्टर संच निर्माण करण्याची गरज काय ?

आस्की किंवा इस्की यांसारखे कॅरॅक्टर सेट फक्त ठरावीक भाषेसाठी ठरवण्यात आले आहेत. भारतीय भाषांसाठी जरी 'इस्की' संच असला तरी तो 'आस्की'चेच रुप आहे. कारण 'आस्की'ला फक्त इंग्रजीलाच बरोबर घेऊन पुढे जायचे होते, तर 'इस्की'ला देवनागरीसह इंग्रजीला घेऊन पुढे जायचे होते. जगातील सर्व भाषांचा संगणकावर वापर करता यावा व सर्व भाषा एकाच कॅरॅक्टर सेटमध्ये वापरता याव्यात यासाठी युनिकोडची निर्मिती करण्यात आली.

युनिकोड मध्ये देवनागरी

(The en:Unicode range for Devanāgarī is U+0900 .. U+097F.)

राखाडी रंगाचा ठोकळा अक्षरांसाठी सध्या रिकामी ठेवलेली घरे दाखवतो.
जर तुम्हाला सर्व अक्षरे योग्य प्रकारे दिसत नसतील तर ही pdf संचिका डाउनलोड करा (उतरवून घ्या)

युनिकोड 0 1 2 3 4 5 6 7 8 9 A B C D E F
U+090x
U+091x
U+092x
U+093x ि
U+094x
U+095x
U+096x
U+097x ॿUnicode Chart for Devanagari

Other Languages
Afrikaans: Unicode
Alemannisch: Unicode
አማርኛ: ዩኒኮድ
العربية: يونيكود
অসমীয়া: ইউনিক’ড
asturianu: Unicode
azərbaycanca: Unicode
Boarisch: Unicode
беларуская: Унікод
беларуская (тарашкевіца)‎: Юнікод
български: Уникод
বাংলা: ইউনিকোড
brezhoneg: Unicode
bosanski: Unicode
català: Unicode
Mìng-dĕ̤ng-ngṳ̄: Unicode
ᏣᎳᎩ: ᏳᏂᎪᏛ
کوردی: یوونیکۆد
čeština: Unicode
Чӑвашла: Юникод
Cymraeg: Unicode
dansk: Unicode
Deutsch: Unicode
Ελληνικά: Unicode
English: Unicode
Esperanto: Unikodo
español: Unicode
eesti: Unicode
euskara: Unicode
فارسی: یونی‌کد
suomi: Unicode
français: Unicode
Gaeilge: Unicode
galego: Unicode
ગુજરાતી: યુનિકોડ
客家語/Hak-kâ-ngî: Unicode
עברית: יוניקוד
हिन्दी: यूनिकोड
hrvatski: Unikod
magyar: Unicode
հայերեն: Յունիկոդ
interlingua: Unicode
Bahasa Indonesia: Unicode
Ilokano: Unicode
íslenska: Unicode
italiano: Unicode
日本語: Unicode
Basa Jawa: Unicode
ქართული: უნიკოდი
қазақша: Юникод
ಕನ್ನಡ: ಯುನಿಕೋಡ್
한국어: 유니코드
कॉशुर / کٲشُر: यूनिकोड
kurdî: Unicode
Кыргызча: Юникод
Lingua Franca Nova: Unicode
lietuvių: Unikodas
latviešu: Unikods
मैथिली: युनिकोड
олык марий: Unicode
മലയാളം: യൂണികോഡ്
монгол: Юникод
Bahasa Melayu: Unicode
မြန်မာဘာသာ: ယူနီကုဒ်
Plattdüütsch: Unicode
नेपाली: युनिकोड
नेपाल भाषा: युनिकोड
Nederlands: Unicode
norsk nynorsk: Unicode
norsk: Unicode
occitan: Unicode
ਪੰਜਾਬੀ: ਯੂਨੀਕੋਡ
polski: Unikod
português: Unicode
română: Unicode
русский: Юникод
संस्कृतम्: युनिकोड
саха тыла: Юникод
Scots: Unicode
srpskohrvatski / српскохрватски: Unikod
සිංහල: යුනිකෝඩ්
Simple English: Unicode
slovenčina: Unicode
slovenščina: Unicode
shqip: Unicode
српски / srpski: Unikod
Basa Sunda: Unicode
svenska: Unicode
తెలుగు: యూనికోడ్
тоҷикӣ: Юникод
Tagalog: Unikodigo
Türkçe: Unicode
ئۇيغۇرچە / Uyghurche: Unicode
українська: Юнікод
اردو: یونیکوڈ
Tiếng Việt: Unicode
walon: Unicôde
吴语: Unicode
მარგალური: იუნიკოდი
ייִדיש: יוניקאד
Yorùbá: Unicode
中文: Unicode
文言: 萬國碼
Bân-lâm-gú: Unicode
粵語: 統一碼