पहिले महायुद्ध
English: World War I

पहिले महायुद्ध
वरून सव्य पद्धतीने: पश्चिम आघाडीवरील खंदक, खंदक ओलांडताना ब्रिटिश मार्क ४ रणगाडे, दार्दानेल्लेच्या लढाईत पाणसुरुंगास धडकून एचएमएस इर्रे‍झिस्टिबल हे रॉयल नेव्हीचे लढाऊ जहाज बुडताना, गॅस-मुखवटे घालून व्हिकर्स मशीनगन चालवणारे सैनिक, जर्मन आल्बाट्रोस डी.३ जोडपंखी विमाने
वरून सव्य पद्धतीने: पश्चिम आघाडीवरील खंदक, खंदक ओलांडताना ब्रिटिश मार्क ४ रणगाडे, दार्दानेल्लेच्या लढाईत पाणसुरुंगास धडकून एचएमएस इर्रे‍झिस्टिबल हे रॉयल नेव्हीचे लढाऊ जहाज बुडताना, गॅस-मुखवटे घालून व्हिकर्स मशीनगन चालवणारे सैनिक, जर्मन आल्बाट्रोस डी.३ जोडपंखी विमाने
दिनांकइ.स. १९१४ - इ.स. १९१८
(युद्धबंदी)
२८ जून, इ.स. १९१९ रोजी घडलेला व्हर्सायचा तह
स्थानयुरोप, आफ्रिका, मध्यपूर्व, प्रशांत महासागरी बेटे, चीन & उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका
परिणतीदोस्त राष्ट्रांचा विजय
  • प्रशियन, रशियन, ओस्मानी, ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्यांचा अस्त
  • युरोप व मध्यपूर्वेत नवीन देशांची निर्मिती
युद्धमान पक्ष
दोस्त राष्ट्रे
फ्रान्स फ्रान्स
युनायटेड किंग्डम ब्रिटिश साम्राज्य,
रशिया रशियन साम्राज्य
इटलीचे राज्य
Flag of the United States अमेरिका
रोमेनिया रोमेनियाचे राज्य
जपान जपानी साम्राज्य
सर्बिया सर्बियाचे राज्य
बेल्जियम ध्वज बेल्जियम
ग्रीस ग्रीसचे राज्य
पोर्तुगाल पोर्तुगाल
माँटेनग्रो
केंद्रवर्ती सत्ता
जर्मन साम्राज्य जर्मन साम्राज्य
Flag of Austria-Hungary (1869-1918).svg ऑस्ट्रिया-हंगेरी
Ottoman flag.svg ओस्मानी साम्राज्य
Flag of Bulgaria.svg बल्गेरिया
सेनापती
फ्रान्स रेमाँ प्वांकारे

फ्रान्स जोर्ज क्लेमेन्सो
फ्रान्स फेर्डिनाँड फॉश
युनायटेड किंग्डम एच.एच. आस्क्विथ
युनायटेड किंग्डम डेव्हिड लॉइड जॉर्ज
युनायटेड किंग्डम डग्ल्स हेग
रशिया दुसरा निकोलाय
रशिया निकोलाय निकोलायव्हिच
आंतोन्यो सालांद्रा
वित्तोरियो ओर्लांडो
लुइजी कादोर्ना
अमेरिकावूड्रो विल्सन
अमेरिकाजॉन पर्शिंग

जर्मन साम्राज्य दुसरा विल्हेल्म

जर्मन साम्राज्य पाउल फॉन हिंडनबुर्ग
जर्मन साम्राज्य एरीख लूडेनडॉर्फ
Flag of Austria-Hungary (1869-1918).svg पहिला फ्रांत्स योसेफ
Flag of Austria-Hungary (1869-1918).svg पहिला कार्ल
Flag of Austria-Hungary (1869-1918).svg कोनराड फॉन ह्यॉट्झेनडोर्फ
Ottoman flag.svg पाचवा मेहमेद
Ottoman flag.svg एन्वेर पाशा
Ottoman flag.svg मुस्तफा कमाल अतातुर्क
Flag of Bulgaria.svg पहिला फेर्डिनान्ड
Flag of Bulgaria.svg निकोला शेकोव्ह

सैन्यबळ
रशियन साम्राज्य १२,०००,०००,

युनायटेड किंग्डम ब्रिटिश साम्राज्य ८,८४१,५४१
फ्रान्स फ्रान्स ८,६६०,०००
इटलीचे राज्य ५,०९३,१४०
Flag of the United States अमेरिका ४,७४३,८२६
रोमेनियाचे राज्य १,२३४,०००
जपान जपानी साम्राज्य ८००,०००
सर्बिया सर्बियाचे राज्य ७०७,३४३
बेल्जियम ध्वज बेल्जियम ३८०,०००
ग्रीस ग्रीसचे राज्य २५०,०००
पोर्तुगाल पोर्तुगाल २००,०००
माँटेनग्रो ५०,०००
एकूण:४२,९५९,८५०

केंद्रवर्ती सत्ता

जर्मन साम्राज्य १३,२५०,०००
Flag of Austria-Hungary (1869-1918).svg ७,८००,०००
Ottoman flag.svg २,९९८,३२१
Flag of Bulgaria.svg १,२००,०००
एकूण: २५,२४८,३२१

बळी आणि नुकसान
२२,४७७,५००१६,४०३,०००

पहिले महायुद्ध, पहिले महायुद्ध, ग्रेट वॉर, किंवा वॉर टू ॲन्ड ऑल वॉर्स या नावानेही ओळखले जाते. हे युद्ध २८ जुलै १९१४ पासून ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत चालले. इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक अश्या या युद्धात ७ कोटी सैनिकांनी भाग घेतला ज्यापैकी ६ कोटी सैनिक युरोपियन होते. भांडखोर देशांची तांत्रिक आणि औद्योगिक प्रगती आणि प्रदीर्घ खंदक लढायांतून निर्माण झालेली 'जैसे थे' परिस्थिति यामुळे या युद्धात आणि त्याबरोबर झालेल्या विविध शिरकाणांमध्ये ९ लाखांपेक्षा जास्त सैनिक व ७ लाख नागरिक ठार झाले. हा इतिहासातील सर्वात घातक संघर्षांपैकी एक होता, आणि त्यात सामील असलेल्या अनेक देशांमध्ये क्रांती किवा मोठ्या राजकीय बदलांसाठी कारणीभूत झाला. युद्धापूर्वीच्या सुप्त संघर्षांचे पूर्ण निराकरण न झाल्याने या युद्धाअखेरीस एकवीस वर्षांनंतर झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली गेली.

दोस्त राष्ट्रे किंवा ट्रिपल ऑंताँत (रशियन साम्राज्य, फ्रेन्च तिसरी प्रजासत्ताक आणि ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र) आणि केन्द्रीय सत्ता (जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी) या दोन गटात झालेल्या या युद्धात जगातील सर्व आर्थिक महासत्ता ओढल्या गेल्या. जरी इटली हा जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी यांच्याबरोबर तिहेरी युतीचा सदस्य असला तरी, ऑस्ट्रिया-हंगेरीने युतीच्या अटींविरुद्ध जाऊन आक्रमण केल्यामुळे त्याने केन्द्रीय सत्तांच्या बाजूने युद्धात भाग घेतला नाही. जसजसे अधिकाधिक देश या युद्धात सामील झाले तसतशी युद्धपूर्व आघाड्यांची वाढ आणि पुनर्रचना झाली. इटली, जपान आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने दोस्त राष्ट्रांत सामील झाले, तर ओस्मानी साम्राज्य आणि बल्गेरिया केन्द्रीय सत्तांमध्ये सामील झाले.

२८ जून् १९१४ रोजी सारायेव्होमध्ये जहाल युगोस्लाव्ह राष्ट्रवादी गॅव्ह्रिलो प्रिन्सिप यांनी ऑस्ट्रिया-हंगेरीच्या सिंहासनचा वारसदार असलेल्या ऑस्ट्रियाचे आर्चड्यूक फ्रांझ फर्डिनांडयांची हत्या केली आणि या युद्धाची ठिणगी पडली. फ्रान्झ फर्डिनांडच्या मृत्यूनंतर जर्मन साम्राज्याच्या चिथावणीवरून ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियासोबत युद्धाची घोषणा केली. या आधीच्या दशकात झालेल्या विविध करारांनी युरोपातील सर्वच देश परस्परांशी बांधले गेले होते. त्यामुळे जेव्हा २३ जुलै रोजी ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाला निर्वाणीचा इशारा पाठवला, तेव्हा एक राजनैतिक पेचप्रसंग निर्माण झाला. काही आठवड्यांतच प्रमुख सत्ता युद्धात उतरल्या, आणि जुलै १९१४ मध्ये बाल्कन भागात सुरू झालेले हे युद्ध झपाट्याने पूर्ण युरोपभर पसरले.

सर्वात आधी २४-२५ जुलै रोजी रशियाने आपलया सैन्याची अंशतः जमवाजमव सुरु केली. २८ जुलै रोजी ऑस्ट्रो-हंगेरियन लोकांनी सर्बियाविरुद्ध युद्ध घोषित केले त्यापाठोपाठ रशियाने ३० जुलै रोजी जाहीरपणे सैन्याची जमवाजमव सुरु केली. जर्मनीने ही जमवाजमव थांबवण्यासाठी रशियाला ३१ जुलैच्या मध्यरात्री रशियाला निर्वाणीचा खलिता पाठवला. रशियाने ही मागणी अमान्य केल्यानंतर १ ऑगस्ट रोजी जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध जाहीर केले. रशियाबरोबरच जर्मनीने फ्रान्सलादेखील निर्वाणीचा खलिता पाठवला, आणि फ्रान्सच्या तटस्थतेची हमी म्हणून फ्रेंचांच्या ताब्यातील दोन किल्ले जर्मनीच्या ताब्यात् देण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण करण्यास फ्रान्सने असमर्थता दर्शवली आणि १ ऑगस्ट रोजी सैन्याची जमवाजमव सुरु केली. ३ ऑगस्ट रोजी जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्ध जाहीर केले. फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातील सीमा दोन्ही बाजूंनी मजबूत होती. त्यामुळे श्लिफेन योजनेनुसार, जर्मनीने तटस्थ बेल्जियम आणि लक्झेंबर्गवर आक्रमण करून उत्तरेकडून फ्रान्सवर चढाईची तयारी केली. यात बेल्जियन तटस्थतेचे उल्लंघन झाल्यामुळे ब्रिटनने ४ ऑगस्ट रोजी जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले. मार्नच्या लढाईत जर्मन सैन्याची आगेकूच थोपवण्यात दोस्त राष्ट्रांना यश आले. त्यानंतर पश्चिम आघाडीवरच्या लढाईला एका प्रचंड वेढ्याचे स्वरूप आले आणि दोन्ही सैन्यांकडून खंदकांची एक मोठी साखळी तयार झाली. १९१७ सालापर्यंत या साखळीत फारसा फरक पडला नाही. पूर्व आघाडीवर रशियाने ऑस्ट्रिया-हंगेरीविरुद्ध यश मिळवले, पण जर्मन सैन्याने टॅनबेनबर्ग आणि मासुरियन लेक्सच्या युद्धात रशियाचे पूर्व प्रशियावरील आक्रमण परतवून लावले. नोव्हेंबर १९१४ मध्ये, ओस्मानी साम्राज्य केन्द्रीय सत्तांच्या बाजूने सामील झाले आणि कॉकेशस, मेसोपोटेमिया आणि सिनाई येथे नव्या आघाड्यांवर युद्धाला सुरुवात झाली. १९१५ मध्ये इटलीने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने भाग घेतला आणि बल्गेरिया केन्द्रीय सत्तांच्या बाजूने सामील झाला; १९१६ मध्ये रोमेनिया आणि १९१७ साली अमेरिकेची संयुक्त संस्थाने दोस्त राष्ट्रांत सामील झाले.

मार्च 1 9 17 मध्ये रशियन सरकार कोसळले आणि नोव्हेंबरमध्ये एक क्रांती झाली आणि पुढील लष्करी पराभवानंतर रशियाला ब्रेस्ट लिटोव्हस्कच्या तहनीद्वारे सेंट्रल पॉवर्सशी संबंधित अटींचा लाभ झाला, ज्यामुळे जर्मनांना महत्त्वपूर्ण विजय मिळाला. 1 9 18 च्या वसंत ऋतू मध्ये वेस्टर्न फ्रंटला एक आश्चर्यकारक जर्मन आक्षेपार्ह साम्राज्य निर्माण केल्यानंतर, मित्र राष्ट्रांनी प्रतिस्पर्धी हल्ल्यांच्या मालिकेमध्ये जर्मन सैन्याला परतवून लावले. 4 नोव्हेंबर 1 9 18 रोजी, ऑस्ट्रो-हंगेरी साम्राज्य एक युद्धकलापात मान्य झाले आणि जर्मनीला क्रांतिकारकांशी स्वतःची समस्या होती, 11 नोव्हेंबर 1 9 18 रोजी युद्धनौकेवर सहमती दर्शवली, ज्यामुळे मित्र राष्ट्रांच्या विजयाची लढाई संपली.

युद्धाच्या अखेरीस किंवा काही काळानंतर जर्मन साम्राज्य, रशियन साम्राज्य, ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्य आणि ऑट्टोमन साम्राज्य अस्तित्वात नव्हते. नॅशनल बॉर्डरची पुनर्मुद्रण करण्यात आली, अनेक स्वतंत्र राष्ट्रांनी पुनर्संचयित केले किंवा तयार केले, आणि जर्मनीच्या वसाहतींना व्हिक्टर्समध्ये फेकून दिले गेले. 1 9 1 9 च्या पॅरिस शांतता परिषदेदरम्यान, बिग फोर (ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका व इटली) यांनी त्यांच्या करारांची एक श्रृंखला दिली. अशा संघर्षाची पुनरावृत्ती टाळण्याच्या उद्देशाने संघटनेची स्थापना झाली. हा प्रयत्न अयशस्वी झाला, आणि आर्थिक उदासीनता, नूतनीकरण नवीकरण झालेली उत्तराधिकारी राज्ये, आणि अपमान (विशेषत: जर्मनीमध्ये) च्या भावनांनी अखेरीस द्वितीय विश्वयुद्धाच्या सुरुवातीला योगदान दिले.

अनुक्रमणिका

Other Languages
Alemannisch: Erster Weltkrieg
žemaitėška: Pėrma svieta vaina
беларуская (тарашкевіца)‎: Першая сусьветная вайна
qırımtatarca: Birinci Cian cenki
emiliàn e rumagnòl: Prémma guèra mundièl
English: World War I
Esperanto: Unua mondmilito
estremeñu: I Guerra Mundial
Nordfriisk: Iarst Wäältkrich
kriyòl gwiyannen: Prémyé Lagèr mondyal
Gàidhlig: An Cogadh Mòr
客家語/Hak-kâ-ngî: Thi-yit-chhṳ Sṳ-kie Thai-chan
Fiji Hindi: World War I
Kreyòl ayisyen: Premyè Gè mondyal
Bahasa Indonesia: Perang Dunia I
Patois: Wol Waar I
къарачай-малкъар: Биринчи дуния къазауат
Lëtzebuergesch: Éischte Weltkrich
Bahasa Melayu: Perang Dunia Pertama
မြန်မာဘာသာ: ပထမ ကမ္ဘာစစ်
مازِرونی: جهونی جنگ اول
Dorerin Naoero: Eaket Eb I
Plattdüütsch: Eerste Weltkrieg
Nedersaksies: Eerste Wealdkrieg
नेपाल भाषा: तःहताः १
norsk nynorsk: Den fyrste verdskrigen
romani čhib: Primul Razboi Mondial
srpskohrvatski / српскохрватски: Prvi svjetski rat
Simple English: World War I
slovenščina: Prva svetovna vojna
Soomaaliga: Dagaalkii koowaad
српски / srpski: Први светски рат
Türkmençe: Birinji jahan urşy
ئۇيغۇرچە / Uyghurche: بىرىنچى دۇنيا ئۇرۇشى
oʻzbekcha/ўзбекча: Birinchi jahon urushi
vepsän kel’: Ezmäine mail'man voin
Volapük: Volakrig balid